top of page
  • Mr. Amey Patil

'DONATE BLOOD SAVE LIFE'

An Initiative by Bhairi Bhavani Performing Arts

२३ मार्च २०२१ रोजी शहिद भगत सिंग,शहिद राजगुरू,शहिद सुखदेव व शहिद अश्फाकं उल्ला खान ह्यांच्या ९० व्या शहिद दिनानिमित्त ९०००० रक्तदात्यांकडून रक्त संग्रहित करून रेड क्रॉस सोसायटी व अनेक रक्तपेढ्यानकडे सुपुर्द केले जाणार आहे.ह्या अभियानाचे नाव "संवेदना" असून ह्या अभियानाची नोंद जागतिक विक्रमामध्ये (Guinness record)होणार आहे. NIFFA ह्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर (श्री प्रीतपाल पनू),भैरी भवानी परफॉरमिंग आर्ट्स चे सचिव श्री अमेय पाटील ह्यांनी आज महाराष्ट्रचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंग कोशियारी ह्यांची राजभवन येते भेट घेतली,युवकांना रक्तदानाबद्दल अजून कसे प्रोत्साहित व जागरूक करता येईल ह्याबद्दल चर्चा करत "संवेदना" ह्या मोहिमेच्या उदघाटन कार्यक्रमाला आमंत्रित केले. ह्या वेळेला मार्गदर्शक श्री सतीश जोंधळे,श्री परवेश गाभा व महाराष्ट्र,गोवा हरियाणा मधील युवक व पदाधिकारी उपस्तीत होते.


जर आपण सुद्धा "SAMVEDANA " 'DONATE BLOOD SAVE LIFE' ह्या अभियानामध्ये सहभागी होऊ इच्छित आहात तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता.तसेच आपण आपल्या संस्थेतर्फे सुद्धा ह्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकता.आपला संपर्क क्रमांक आपण कंमेंट बॉक्स मध्ये द्यावा आमचे समन्वयक आपल्याशी संपर्क साधतील.

*प्रत्येक सहभागी संस्थेला जागतिक विक्रम प्रशस्तीपत्राची लिंक देण्यात येणार आहे व ह्या अभियानाशी संलग्न असलेल्या कलाकारांचे व राष्ट्रीय नेत्यांचे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

( नियम व अटी लागू आहेत)27 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page